October 16, 2021

यवतमाळ जीवन प्राधिकरण बनले दलालांचे अड्डे —– मनोज गेडाम यांचा आरोप

 

प्रतिनिधी यवतमाळ :- सध्या यवतमाळ शहरातील पिण्याचे पाण्याचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे,शहरालगत असलेल्या जनक नगरी येथील नागरिकांनी नळजोडणी करिता रीतसर अर्ज करून सुद्धा त्यांना नळजोडणी मिळाली नाही, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता हुंगे यांचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, यावेळी गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना जनक नगरी येथील नागरिकांना त्वरित नळ जोडणी करून द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले

यवतमाळ जीवन प्राधिकरण बोगस कारभार यामुळे नेहमी चर्चेत राहते, शहरालगत असलेल्या जनक नगर येथील नागरिकांनी नळ जोडणीकरीता रीतसर अर्ज केले मात्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता हुंगे म्हणतात आमच्याकडे पाईप शिल्लक नाही, जिल्हाधिकाऱ्यांना सांगा आम्हाला पैसे उपलब्ध करून द्या, असे जनक नगरी येथील प्रत्येक नागरिकांना हुंगे सांगतात, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता हुंगे यांनी अमृत योजनेत दाबून मला खाली आहे, जीवन प्राधिकरणात कोणतेही काम हे दलालामार्फत होते असा स्पष्ट आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे,अमृत योजनेची चौकशी करून कार्यकारी अभियंता हुंगे यांची चौकशी करण्याची मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे, घराघरात जीवन प्राधिकरणाचे पाणी पोहोचावं म्हणून केंद्र शासनाने अमृत योजना आणली, मात्र कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभारामुळे जनक नगरी येथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, वारंवार जीवन प्राधिकरणाला गुरुदेव संघाच्यावतीने निवेदन सुद्धा दिले, मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले जीवन प्राधिकरणाचे अभियंता यांना जाग आली नाही, येत्या दहा दिवसात जनक नगरी येथील नागरिकांना नळजोडणी मिळाली नाही तर गुरुदेव युवा संघ आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed