पांढरकवडा उपविभागीय तर्फे निवडणूक प्रक्रियाचा प्रशिक्षणाचा पहिल्या टप्प्या पुर्ण: अनुपस्थित वर होणार कारवाई
पांढरकवडा उपविभागीय तर्फे निवडणूक प्रक्रियाचा प्रशिक्षणाचा पहिल्या टप्प्या पुर्ण: अनुपस्थित वर होणार कारवाई.
पांढरकवडा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या च्या अनुषंगाने आज दिनांक २७/१०/२०२४ रोजी ८०- आर्णी (एसटी) विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीकरिता पहिला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले सदर प्रशिक्षण वर्ग पांढरकवडा येथील माऊली सेलिब्रेशन हॉल येथे घेण्यात आले. यामध्ये ईव्हीएम यंत्राचे प्रशिक्षण वर्ग शिवरामजी मोघे कॉलेज, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल या तीन ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणाकरता एकूण २१७४ कर्मचारी होते त्यापैकी २०५६ कर्मचारी हजर होते तर ११८ कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्गास सुहास गाडे, निवडणूक निर्णय अधिकारी, राजेंद्र इंगळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, विजय साळवे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तसेच वाहुरवाघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण दिले, सदर प्रशिक्षणाची पूर्वतयारी तहसील कार्यालय केळापूर घाटंजी व आर्णी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले, ईव्हीएम यंत्राचे प्रशिक्षण सर्व क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर तलाठी यांनी दिले आहे.