October 30, 2024

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मदन येरावारांचे नामांकन दाखल

 

 

 

महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

प्रतिनिधी यवतमाळ – यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांनी मंगळवार, दि. २९ ऑक्टोंबर रोजी शक्तीप्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी मतदार संघातील हजारो नागरिकांनी उपस्थित लावली होती. तर महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेसुद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी

गेल्या पाच वर्षात आमदार मदन येरावार यांनी मतदार संघामध्ये विकास करून शहराचाच नव्हे तर मतदार संघाचा कायापालट केला. मतदार संघातील सर्वसामान्यांच्या मुलभूत समस्या, अडचणींचे निराकरण आमदार येरावार यांनी केले. शहरातील सुसज्ज बसस्थानक, नाट्यग्रह, क्रिडा संकूल, दारव्हा रोड, आर्णी रोडचे सिमेंट काँक्रिटीकरण, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह शहर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, वीज वितरण विभागाची भव्यदिव्य इमारतीचे काम त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झाले. या कार्याचे फळ मदन येरावार यांना मिळाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट तसेच राष्टवादी अजित पवार गटाचे अधिक्रत उमेदवार म्हणून मदन येरावार यांच्यावरच पक्षाने पुन्हा विश्वास ठेवला. दरम्यान, मंगळवार, दि. २९ ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्या अनुषंगाने सकाळीच यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते. साधारणत: बारा वाजताच्या सुमारास शहरातील अवधूतवाडी व्यायामशाळेच्या प्रांगणात हजारोंच्या संख्येत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार मदन येरावार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कायर्कर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. सुरवातीला दत्त चौकातून नेताजी चौक, येरावार चौक मार्गे एलआयसी चौकात रॅली पोहचली. याच ठिकाणी रॅलीची सांगता झाली. दरम्यान, महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांना विजयी करण्याचा संकल्प या सभेत करण्यात आला.

 

 

नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आयोजीत संकल्प सभेला महायुती समन्वयक डॉ. प्रवीण प्रजापती, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, रेखा कोठेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शाम जयस्वाल, शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख हरीहर लिंगणवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तारीख लोखंडवाला, उत्तम गुल्हाणे, रिपब्लीकन पार्टीचे अश्वजीत शेळके, भाजप शहराध्यक्ष शंतनू शेटे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुका प्रमुख चिंतामण पायघन, दत्ता रहाणे, विजय राय, प्रशांत यादव, डॉ. दीपक शिरभाते, अमोल देशमुख, नितीन गिरी, विजय खडसे, मायाताई शेरे, शैला मिर्झापुरे, निर्मला विनकरे, अजय खोंड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहीत राठोड, आकाश धुरट, सूरज गुप्ता, सूरज जैन, योगेश पाटील, संदीप तातेड यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संखेने सहभागी झाले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed