यवतमाळ जिल्हा तर्फे आर्णी पोलीस निरिक्षकांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान
यवतमाळ जिल्हा तर्फे आर्णी पोलीस निरिक्षकांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान.
आर्णी प्रतिनिधी- आर्णी पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष केशव ठाकरे यांनी सप्टेंबर२०२४ मध्ये,आर्णी पोलीस स्टेशन चे गुन्हे निर्गती मोहीम मध्ये भरीव व कौतुकास्पद कामगिरी केली.
तसेच या महिन्यात गुन्हे नीर्गती व हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत सुध्दा आर्णी पोलीस स्टेशन हे जिल्हात प्रथम क्रमांक वर आहे. आणि आता नुकताच आर्णी येथील रुग्ण सेवक तसेच रुग्णवाहिका चालक याचा मृत्यू झाला होता. त्याच रुग्ण सेवकांच्या परिवाराला भरीव आर्थिक मदत देऊन आर्णी पोलिसांनी सामाजिक बांधिल की जपल्या बद्दल आर्णी पोलीस स्टेशन चे निरीक्षक केशव ठाकरे यांचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पियूष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ तर्फे शुभेच्छा सह प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.