नियंमाचा आधार घेऊन आर ओ प्लांट वरील कारवाई थांबविली

प्रा. डॉ. प्रविण प्रजापती यांचा पुढाकार, कारवाईच्या नोटीसने उडाली खळबळ
प्रतिनिधी यवतमाळ:- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार यवतमाळ नगर पालिकेने यवतमाळातील आर ओ प्लांट चालविणा-या व्यावसाईकांना विविध परवानगीच्या अनुषंगाने नोटीस बजावल्या आहे. दरम्यान या नोटीस मुळे आर ओ प्लांट व्यावसाईकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आता मात्र या कारवाईच्या विरोधात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच नगरसेवक प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी कायद्याचा तसेच नियमांचा आधार घेऊन ही कारवाई थांबविण्यात यश मिळविले आहे.
दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 रोजी महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाने यवतमाळच्या नगर पालिकेला शहरातील आर ओ प्लांट विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. यामध्ये आर ओ प्लांट धारकांना अन्न व औषधी प्रशासन तसेच भूजल सर्वेक्षण विभागाचा परवाना आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने यवतमाळ नगर पालिकेने दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील शंभर पेक्षाही जास्त आर ओ प्लांट व्यावसाईकांना सात दिवसात परवाने सादर करण्याच्या नोटीस बजावल्या. शहरातील आर ओ प्लांट व्यावसाईक अन्न व औषध तसेच भूजल सर्वेक्षण विभागात परवानगी साठी गेले असता अशा प्रकारची परवानगी देण्याचे अधिकार आपल्या कार्यालयाशी संबंधीत येत नसल्याचे सांगीतले. त्यामुळे निर्माण झालेला पेच बघून सर्व व्यावसाईकांनी भाजपाचे उपाध्यक्ष प्रविण प्रजापती यांना निवेदन देऊन त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
हा प्रश्न कायदेशीर असल्यामुळे प्रविण प्रजापती यांनी विविध नियम तसेच कायद्यांचा अभ्यास केला आणि हा प्रश्न मार्गी लावला. आता अन्न व औषध प्रशासनाच्या अंतर्गत कारवाई केल्या जाऊ शकत नसल्याचे पत्र घेण्यात आले आहे. याशिवाय हरीत लवादाच्या राजपत्र अनुसार प्रति दिवस 10 घनमिटर पेक्षा कमी पाण्याचा वापर करणा-या व्यावसाईकांना परवानगीची अट शिथील असल्याबाबत चे पत्र सुध्दा प्रविण प्रजापती यांनी प्राप्त करुन घेतले आहे. याशिवाय कामठी नगर पालिकेच्या सीईओ ने त्यांच्या कार्यक्षेत्रात 5 हजार रुपये रक्कम भरुन परवाना पंजिकृत करण्याचे तसेच दरवर्षी 1 हजार रुपये भरुन परवाना नियमित करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची प्रत सुध्दा प्रजापती यांनी प्राप्त करुन घेतली आहे. एकंदरीत अचानक उध्दभलेल्या प्रशासकीय संकटाला प्रविण प्रजापती यांनी नियम तसेच कायद्याचा अभ्यास करुन आर ओ प्लांट वरील कारवाई थांबविण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे प्रविण प्रजापती यांनी नगर पालिकेकडे व्यावसाईकांना अर्ज सादर करण्याचे सांगून हा व्यवसाय आता नियमित आणि नियमांच्या अधिन चालविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याअनुषंगाने आतापर्यन्त 77 व्यावसाईकांचे सर्व कागदपत्रांसह अर्ज नगर पालिकेकडे जमा झाले आहे. उर्वरीत अर्ज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एैन कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवसाय डबघाईस आलेले असतांना निर्माण झालेल्या संकटातून बाहेर काढल्यामुळे विशेष कार्यक्रम घेऊन आर ओ प्लांट व्यावसाईकांनी प्रविण प्रजापती यांचे आभार मानले.
तुम्ही फक्त आवाज द्या
व्यवसाय करतांना अनेक अडचणी येत असतात. शहरातील आर ओ प्लांट वर होणारी कारवाई मात्र बेकायदेशीर असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही नियम तसेच कायद्याचा अभ्यास करुन ही कारवाई टाळण्यात यशस्वी झालो. कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवसाय डबघाईस आले आहे. अशातच संकटात आलेल्या आर ओ प्लांट व्यावसाईकांना थोडी मदत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. कुठलेही संकट आल्यास नागरीकांनी फक्त आवाज द्यावा मी आपल्या मदतीसाठी तत्पर राहील.