मुख्याधिकारी यांचे प्रधानमंत्री आवास योजने कडे दुर्लक्ष गुरुदेव संघाचा आरोप
नगर रचना प्रमुख देशपांडे देतात उडवाउडवीचे उत्तर
2016 पासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या फाईलचा नगरपरिषदेत ढिगारा
भारतातील सर्व गोर गरीबांना हक्काचे छत मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना आणली,2016 पासून यवतमाळ नगर परिषदेचे तीन मुख्याधिकारी बदलून सुद्धा गरीबांना हक्काचे घर मिळाले नाही,
यवतमाळ नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजनेच्या फाईलचा ढिगारा असून फाईल धूळ खात आहे, नगर रचना प्रमुख देशपांडे यांना याबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहे, असा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे
केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे हा उद्देश ठेवून पंतप्रधान आवास योजना आणली,मात्र यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी याकडे गांभीर्याने बघत नसून नगर रचना प्रमुख देशपांडे हे गरिबांना उडवाउडवीचे उत्तर देत आहे, देशपांडे यांना विचारणा केली असता माझ्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेचे एकच काम आहे काय ? असं बोलतात असा आरोप यावेळी मनोज गेडाम यांनी केला आहे,
यवतमाळ शहरात 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजनेचे पाटीपुरा, विटाभट्टी, जनक नगरी,तायडे नगर, लुम्बिनी नगर, विटा भट्टी, येथील नागरिकांनी रीतसर अर्ज केले मात्र नगरपरिषद अधिकारी त्यांना टोलवाटोलवी करीत आहे, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी थोड्याशा आर्थिक लोभा पोटी श्रीमंतांना दिला असल्याचा आरोप यावेळी मनोज गेडाम यांनी केला आहे,
पण यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नसल्याचे मनोज गेडाम यांनी सांगितले, येत्या आठ दिवसात गरिबांना पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी नगरपरिषदेने हालचाली केल्या नाही तर गुरुदेव संघाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित असलेल्या नागरिकांसोबत तिरडी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज मॅडम यांनी सांगितले आहे