सोनार समाजबांधवांना आर्टिसन कार्ड वितरित

यवतमाळ:- सोनार सेवा महासंघ व भारतीय सुवर्णकार संघाच्या संयुक्त विद्यमाने समाज बांधवांना आर्टिसन कार्ड चे वितरण करण्यात आले. स्थानिक टिळक स्मारक मंदिरात 1 डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळवी सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळवी तर उदघाटक म्हणून अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल गुहे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रामचंद्र येरपुडे नागपूर, जिल्हा कारागृह अधीक्षका कीर्ती चिंतामणी, सेवानिवृत्त तहसीलदार रमेश इनकाने, नरहरी उज्जैनकार, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हा संघटक विकास जावळकर, नानाभाऊ खरवडे, पत्रकार विनोद बिंड होते. मान्यवरांचे हस्ते सोनार समाज बंधू भगिनींना केंद्रीय मंत्रालयाच्या उद्योग विभागाद्वारे प्राप्त आर्टिसन कार्ड वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात सुवर्णकार प्रशांत गोडे यांनी त्यांचे वडील कृष्णराव गोडे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 21 प्रावीन्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी सर्वजण एकसंघ असल्यास समाजाची प्रगती होते, तेव्हा एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कीर्ती चिंतामणी यांनी समाजातील कारागिरांना मदत करण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगून यवतमाळ संघात ती ताकद असल्याचे स्पष्ट केले। रामचंद्र येरपुडे यांनी योजनांची माहिती विशद केली. जगदीश माळवी, नरहरी उज्जैनकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऍड प्रवीण हर्षे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला,

सोबतच जेष्ठ समाजबांधव मनोहर काटोले, विंचूरकर, जावळकर, राजू मांडळे, उमाकांत मुडे, प्रकाश कुऱ्हडवार, मंगेश खुणे, वैशाली लोळगे, मोना देवगिरकर, प्रियंका गोडे, माधवी लोळगे आदींना गौरविण्यात आले. प्रास्ताविक लक्ष्मीकांत लोळगे, संचालन प्रमोद बहाड तर ऍड प्रवीण हर्षे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नानभाऊ हर्षे, दिनकर पुल्लजवार, दिनेश निनावे, मनोज दहिवाळ, किरण खरवडे, नानभाऊ खरवडे, अशोक बानोरे, मारोतराव एलगंधरवर, मंगेश खुणे, राहुल चिंचमलातपुरे, मुकेश खरवडे, प्रशांत रोकडे, उदय सज्जनवार, प्रशांत सावळकर, राहुल गुरव, संतोष रत्नपारखी, राजेश तळनकार, उमेश ढोमणे, कुणाल मस्के, किशोर करंडे यांचेसह सोनार समाज सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *