उमरखेड मतदार संघात किसन वानखडे विजयी.

भाजप चे नितीन भुतडा ठरले किंग मेकर.

सलग तिसऱ्यांदा महागाव उमरखेड मध्ये फुलले कमळ.

 

उमरखेड. महागाव विधानसभा मतदार संघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार किसनराव वानखेडे हे प्रथमच आमदार झाले असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचा १६७६० एवढ्या मतांनी पराभव केला आहे. पुन्हा एकदा भाजपला आपला गड राखण्यात यश आले आहे. उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघात भाजप व काँग्रेसच्या उमेदवारात ‘काटे की टक्कर’ पाहावयास मिळाली होती मतदानाच्या अखेरपर्यंत काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे हे जनतेच्या चर्चेत आघाडी वर असल्याचे दिसून येत होते परंतु मत पेटीत लाडक्या बहिणीनि दाखवलेला विश्वास सार्थक करून दाखविल्याने भाजपचे कमळ उमरखेड विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा फुललेले आहे,परत एकदा भाजपचे नितीन भुतडा किंगमेकर ठरल्याचे दिसून आले. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असतांना मात्र मतदारांनी परत जनशक्तीला साथ दिल्याने भाजपचे उमेदवार किसनराव वानखेडे यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचा १६७६० मतांनी पराभव करून मतदार संघात कमळाची ताकत दाखऊन दिली आहे. विजयी उमेदवार किसनराव वानखेडे यांची उमरखेड शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे किगमेकर नितीन भुतडा, माजी आमदार नामदेव ससाणे व शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed