जुना उमरसरा येथे सुरू असलेला अवैद्य दारू अड्डा बंद करा
जुना उमरसरा येथे सुरू असलेला अवैद्य दारू अड्डा बंद करा
महिला धडकल्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात.
अवैद्य दारूअड्डा मुळे जुना उमरसरा परिसरात गुन्हेगारी वाढली.
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील जुना उमरसरा तीन फोटो मागे गेल्या अनेक वर्षापासून अवैद्य दारू अड्डा सुरू असून ह्या दारू अड्ड्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे, त्यामुळे तीन फोटोच्या मागेच सुरू असलेला अवैध दारूअड्डा त्वरित बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असे म्हणत जुना उमरसरा परिसरातील महिला राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ कार्यालयात धडकल्या व मागण्यांचे निवेदन सादर केले.
जुना उमरसरा परिसरातील तीन फोटो मागेच गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारूअड्डा सुरू आहे या दारू अड्ड्यामुळे अनेक नागरिकांना दारूचे व्यसन जडले आहे, तसेच दारूमुळे अनेकांचे संसार सुद्धा उघड्यावर आले आहे, तरुण पिढी सुद्धा या दारू व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहे, अशातच या अड्ड्यावर रात्री दरम्यान शहरातील अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर असल्याने येथील परिसरातील महिला भयभीत झाल्या आहे, अशातच या परिसरात चाकू हल्ले तसेच किरकोळ वाद सुद्धा नेहमी होताना दिसत आहे,या संपूर्ण प्रकाराबाबतची माहिती परिसरातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ यांना निवेदनाद्वारे दिली मात्र या गंभीर विषयाकडे राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ विभागातील अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे, जुना उमरसरा तीन फोटो मागे सुरू असलेल्या दारू अड्डा त्वरित बंद करा ही मागणी घेत परिसरातील महिला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडकल्या व मागण्यांचं निवेदन सादर केलं, परिसरात सुरू असलेला दारूअड्डा त्वरित बंद न केल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यवतमाळ येथे ठिय्या आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी महिलांनी दिला आहे, निवेदन देते वेळी दीपा झोंबाडे, गायत्री येलकर, अर्चना मडावी, लता पेंदोर, लक्ष्मीबाई मेश्राम, सोनू पडधूने, सिद्धू जाधव, गीता गेडाम,शेवंता टेकाम, शोभा सिडाम,पंचकुला कुडमते, पूजन वड्डे आदी महिला उपस्थित होत्या.