आर्णी मार्गावर भीषण अपघात, कारने पाच जणांना चिरडले.
आर्णी मार्गावर भीषण अपघात, कारने पाच जणांना चिरडले.
यवतमाळतील आर्णी मार्गावरील प्रताप गेट जवळील घटना. कारने तीन दुचाकी धारकांसह दोन भाजी विक्रेत्यांना चिरडले.
भरधाव वेगात असणाऱ्या एका करचालकाने आर्णी मार्गावरील राणा प्रताप गेट जवळ तीन दुचाकी चालकासह दोन भाजी विक्रेत्यांना चिरडले हा अपघात ईतका भीषण होता की या अपघातात दुचाकी संपूर्ण वाहनचा चुराडा झाला.
अपघात होताच अपघातातील जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठून कार चालकाला ताब्यात घेतले.