स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, सुमारे एक कोटी ३४ लाख लाखांचा अवैध गुटख्यासह कंटेनर जप्त.

 

 

स्थानिक गुन्हे शाखे कडे गोपनीय सुत्रांकडुन माहिती मिळली की, पांढरकवडा रोडने प्रतिबंधीत अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत आहे, अशा प्रकारची गोपनीय माहिती आधारे पिंपळखुटी आर.टी.ओ. चेक पोस्ट येथे वाहनांची चेकींग करीत असतांना वाहन क्रमांक GJ- २७- TF – ०५८२ हे वाहन त्याठीकाणी आले. सदर वाहन तपासणी दरम्यान वाहन चालक हा घाबरलेला अवस्थेत दिसल्याने पोलिसांनी चालकास नाव गाव पत्ता विचारले असता. त्याने त्याचे नाव अख्तरभाई अहमदमिया शेख वय ४७ वर्ष, रा. बहियेल ता. देहगम जि. गांधीनगर, राज्य गुजरात, असे सांगितले. सदर कंन्टेनर वाहन तपासण्या दरम्यान  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध सुगंधित गुटखा मिळून आला. त्याची एकूण किंमत १,०९,५१,८०० रुपये व अशोक लेलॅन्ड पांढरा रंगाचा
कंन्टेनर किंमत २५,००,००० असा एकूण १,३४,५१,८०० चा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस ताब्यात घेऊन
पो.स्टे. पांढरकवडा येथे विविध कलमानुसार गुन्हा
दाखल करण्यात आला असुन, पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे स्थानिक गुन्हे शाखा, हे करीत आहेत. सदर कार्यवाही मा. श्री कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ. श्री. पियुष जगताप, अपर
पोलीस अधीक्षक, यवतमाळ, रामेशेवर वैंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पांढरकवडा, ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, जमादार उल्हास कुरकुटे,सुनील खंडागळे, सुधीर पांडे,सुधीर पिदुरकर, निलेश निमकर,रजनीकांत मडावी, नरेश राऊत, स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed