वाघापूर परिसरातील ३५ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या.
यवतमाळ येथील 35 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे पहाटे चार वाजता च्या दरम्यान ही घटना घडली आहे. आशिष सोनोने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे चार मारेकर्यांनी आशिष च्या डोक्यावर दगडाचे घाव घालून ही हत्या करण्यात आली दरम्यान ही हत्या झाल्यानंतर लोहारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून नेमकी तरुणाची हत्या का करण्यात आली? हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही गेल्या आठ दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.