सिलेंडरचा स्फोट : 50 हजाराचे नुकसान.
सिलेंडरचा स्फोट : 50 हजाराचे नुकसान.
खैरगाव (भेदी ) येथील घटना.
तालुक्यातील खैरगाव (भेदी ) येथील घरातील सिलेंडरचा स्फोट होवून घरातील मूलभूत गरजेसह महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले यात किमान 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.ही घटना दि. 24 सोमवारला सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घडली.
खैरगांव येथील टेकाम कुटुंब वास्तव्यात असून कुटुंब प्रमुख पोतू हा वनविभागात चौकीदार म्हणून कार्यरत होता.सायंकाळी पत्नी शोभा ही स्वयंपाक करण्यास गेली असता गॅस सुरु करताच सिलेंडरचा अनपेक्षित स्फोट झाला. मात्र शोभा ही सुखरूप घरातून बाहेर निघाली. या घटनेत घरातील टीव्ही, कुलर, बँड पार्टीचे साहित्य लाईट सह मूलभूत गरजेचे व महत्वाचे साहित्य जळून खाक होत किमान 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.
सदर घटनेत नुकसान झालेल्या पिडीतांनी शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.