ग्राहक पंचायती तर्फे यवतमाळ मध्ये ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू.
ग्राहक पंचायती तर्फे यवतमाळ मध्ये ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू.
यवतमाळ :- ग्राहकांना न्याय मिळावा, त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी याच उद्देशाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्राहक मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्राहक चळवळीचे प्रणेते स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या 10 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ही केंद्रे सुरू करण्यात आली असून प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे व उद्योजक अरुण भिसे यांच्या हस्ते केंद्राचे फलक अनावरण करून या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
शहरातील न्यू सिंघानिया नगरमध्ये डॉ शेखर बंड, दत्त चौकात प्रभाकर वस्त्रं भंडार,गिलानी नगर येथे ॲड. राजेश पोहरे यांच्या निवासस्थानी तसेच कमल कुंज,राधामल जाधवानी महादेव नगर येथे ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय पुसद,दीग्रस,राळेगाव येथेसुद्धा ग्राहक मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सर्वसामान्य ग्राहकांनी या केंद्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे, जिल्हाध्यक्ष अनंत भिसे,जिल्हा संघटक हितेश सेठ, शहराध्यक्ष अँड राजेश पोहरे,सचिव डॉ. शेखर बंड,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कैलास वर्मा,प्रा.मतीन खान, जिल्हा सचिव डॉ. केशव चेटूले यांनी केले आहे. चंद्रकांत गड्डमवार, राधामल जाधवानी,उमेश पकाले,संजय फाळके, सुरेश कट्यारमल,संजय जोशी, प्रकाश चणेवार, इत्यादींनी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले.