## संकल्प ## शब्दरचना पराग पिंगळे यवतमाळ

उंच उंच मी उडणार आहे
ह्या निळ्या नभावरी,
खोल खोल जाणार आहे
निळ्याशार अश्या सागरी ।।
दृष्टीने मी भेदाणार आहे
दाट धुक्याला प्रातः प्रहरी,
स्व तेजाने छेदणार आहे
काळ्याशार अश्या तिमिरी ।।
शब्द अशे गुंफणार आहे
गारुड करतील जे मर्मावरी,
भक्तीने मी व्यापणार आहे
तोड नसे ज्यास या भुवरी ।।
मज कवेत मी घेणार आहे
सारे दुःख असे जे जगावरी,
झेप अशी मी घेणार आहे
हा संकल्प घेउनी मज उरावरी ।।