संविधान एक्स्प्रेस पुर्वरत सुरू करा- राहुल इंगोले—अन्यथा तीव्र आंदोलन करू—-दारव्हा आगरप्रमुखांना निवेदन

यवतमाळ/दारव्हा : – संविधान एक्स्प्रेस बस पूर्वरत सुरू करण्यासाठी दारव्हा प्र.आगार प्रमुख श्रीमती थोटे मॅडम यांना निवेदन दिले असून; स्थानिक दारव्हा आगाराच्या वतीने सण २०१५ साली राहुल इंगोले यांच्या प्रयत्नांनी व शहरातील नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे संविधान दिनाचे औचित्य साधून दारव्हा ते नागपूर(दीक्षाभूमी) या महामार्गावर संविधान एक्स्प्रेस बस सुरु केल्या गेली होती व समोर ती बस तब्बल ५ वर्ष दारव्हा आगाराकडून सुरळीत चालू होती आणि त्यातून मोठ्या स्वरूपात अगाराच्या उत्पनात वाढ व नागरिकांचा प्रतिसाद मिळत होता. परंतु एसटी च्या जाहिरातीचा संपूर्ण अधिकार हा पृथ्वी असोसिएटस चा असल्याने त्यांनी बसवर होत असलेल्या काही जाहिरातीवर आक्षेपाचें पत्र महामंडळाला दिले होते व त्या पत्राचा चुकीचा अर्थ काढत महामंडळाने संविधान एक्सप्रेस व दीक्षाभूमी बसला रिपेंट केल्या गेले असून, दारव्हा आगारातील संविधान व दिग्रस ची दीक्षाभूमी बस बंद करण्यात आल्या होत्या. सध्या एसटी आगारातून अश्वमेघ, शिवशाही,विठाई,तुळजाई, रायगड,संत गजानन महाराज एक्स्प्रेस नावाच्या बसेस सुरू असताना, केवळ संविधान व दीक्षाभूमी एक्स्प्रेस बस हेतू:पुरस्कर बंद करणे चुकीचे तसेच अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर निवेदनाच्या माध्यमातून दोन्ही बस संबंधित आगारातून पूर्वरत सुरू कराव्यात अन्यथा शहरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून यावेळी सदर लेखी निवेदन दिले असून यावेळी राहुल इंगोले,स्वप्नीलभाऊ राठोड, संदीपभाऊ शिले,अनुज शेंडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
*स्टेटमेंट -*
(भारतीय संविधान हे संपूर्ण भारतीय नागरिकांची अस्मिता असून त्यामुळे बसच्या प्रवाशामध्ये एकतेची भावना निर्माण होते परंतु एका त्रयस्थ कंपनीच्या पत्राचा गैरअर्थ काढत महामंडळाकडून संविधान बस बंद करने चुकीचे व अन्यायकारक असून,महामंडळाची प्रतिमा खराब होत आहे व दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करू – राहुल इंगोले,सामाजिक कार्यकर्ते दारव्हा)