खासदार भावनाताई गवळी यांचे शेतकऱ्यांना आव्हान

पत्रकार बंधू आणि भगिनींना,
सप्रेम नमस्कार,
आपल्या जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्या नंतर केवळ 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कंपनी कडून मिळाली. व 158 कोटी रुपये विमा कंपनी फस्त करीत आहे, शेतकऱ्यांवरील हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही पीडितहजारो शेतकऱ्यांसह दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्टेट बँक चौक, यवतमाळ येथे “जबाब दो ” आंदोलन करीत आहोत. आपण या आंदोलन स्थळी भेट द्यावी तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे, ही विनंती।
भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशीम👏