शेतकरी आत्महत्याग्रस्त कोरडवाहू क्षेत्रातील कृषीसमस्यांवरही तोडगा काढा – राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या कार्यक्रमात शेतकरी विधवांची संयुक्त किसान मोर्चा कडे एकमुखी मागणी

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या ३४ दिवसापासून भारत सरकारच्या कृषी सुधारणा करणाऱ्यावर तीन कायद्याच्या विरोधात आंदोलनात विदर्भाच्या हजारो शेतकरी विधवा यांनी आपला पाठींबा दिला असुन जर भारत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर २० जानेवारीला शेकडो विधवा दिल्लीकडे प्रस्थान करून विदर्भ मराठवाडा तेलंगाणा आंध्रप्रदेश मध्यप्रदेश यांचा मागण्या रेटणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी विधवा भारती पवार यांनी दिली .
ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलटकर यांनी यावेळी पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ग्रँड मराठा फौंडेशन शेतकरी विधवांच्या कुटुंबासाठी सतत मागील दहा वर्षांपासून मदत करीत असुन यावेळी त्यांनी आंदोलनासाठी मदतीचा हात पिढी केला त्यांनी यापुर्वी या आत्महत्या कुटुंबातील पहीली ते दहावी (वयोगटातील) मुलांना पुस्तके वाटप करून तसेच या मुलांच्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी अतिरिक्त सहकार्य दिले आहे तसेच यापुर्वी त्यांनी शेकडो शेतकरी विधवांना तसेच त्यांचा पाल्याना मदत केली आहे व मागील एप्रिल पासून त्यांनी हजारो कुटूंबांना मदतीचा हात समोर करून ग्रँड मराठा फॉउंडेशनने त्यांनी निर्माण केलेल्या पानिपत या सिनेमासारखं एक नवा दानशूर व कोरोना योद्धा खऱ्या अर्थाने होण्याचा विक्रम केला आहे
ग्रँड मराठा फाउंडेशन बद्दलः
ग्रँड मराठा फाउंडेशन, शेतकऱ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक सहाय्य पुरवते जे आधुनिक तंत्राच्या कार्यक्षम वितरणास योग्य किंमत देतात जेणेकरून स्वत: साठी उदरनिर्वाह चालविण्यामध्ये आणि शेतकऱ्यांचे कर्ज व दारिद्र्याच्या या वर्तुळात मोडणारी शेतकर्यांना सक्षम बनविणे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रँड मराठा फाउंडेशन देखील शेतकरी मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि शेती व ग्रामीण क्षेत्रात संलग्न उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते ज्यामध्ये विधवा महिला आपले जीवन निर्वाह करू शकतील. त्यांनी शाळांमध्ये संगणकाच्या देणगीद्वारे ई-लर्निंगची ओळख आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जीवनमान मिळावे आणि कर्ज आणि दारिद्र्याच्या या दुष्ट वर्तुळाला तोडगावे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या भागात फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी करून आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास सक्षम बनवून शेतकरी भविष्यकाळात सज्ज होईल यासाठी प्रयन्तशील आहे.