सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलला स्व.श्री. नीलेश पारवेकर (देशमुख) यांचे नाव द्या- मो.आसीम अली यांची मागणी

तत्कालीन आमदार स्व. नीलेश पारवेकर (देशमुख) यांच्या प्रयत्नांने सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची निर्मिती
यवतमाळ प्रतिनिधी :- यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला यवतमाळचे माजी आमदार स्व. श्री. नीलेश पारवेकर (देशमुख) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया कौमी तंजीमचे विदर्भ अध्यक्ष मो.आसीम अली यांनी एका निवेदनातून श्री.व.ना.शा.वै.महा. व रुग्णालय यवतमाळच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. श्री. वजाहत मिर्झा यांना केली आहे.
श्री.वसंतराव शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात, नव्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल हे तत्कालीन आमदार स्व. श्री. नीलेश पारवेकर (देशमुख) यांच्या प्रयत्नांने उभारण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी व दूरदृष्टीकोणामुळेच जिल्ह्याला केंद्रशासनाच्या निधीनतून सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मिळालेले आहे. तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेऊन निर्माण झालेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला “स्व. श्री. नीलेश पारवेकर (देशमुख)” यांचे नाव देण्यात यावे. तसेच त्या परिसरात जिल्हाभरातून येणा-या रुग्णांसाठी एक हॉल (“गांधी सेवा भवन”) देखील उभारण्यात यावे व त्यास निधी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून मो. आसीम अली यांनी केली आहे. या वेळी कौमी तंझीम चे वसीम पटेल, मिर्झा वसीम बेग, शहेबाज अहमद व असिफ खिलजी उपस्थित होते.