मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटनेची कार्यकारणी गठीत
डॉ. भीमराव कोकरे तर सचिवपदी विनोद चिरडे यांची सर्वांनुंमते निवड
यवतमाळ/राळेगाव प्रतिनिधी :- राष्ट्रीय पातळीवरील मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटना,दिल्ली .येथे कार्यरत असून या संघटनेचे ब्रीद वाक्य “मानव अधिकार, जन जन का अधिकार” हे असून याच उद्धेशाने हि संघटना देश, राज्य व स्थानिक पातळी वर कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून भारताच्या संविधाना ने मानवा ला दिलेल्या मूलभूत अधिकार, कर्तव्यावर कुणाकडून अन्याय, अत्याचार, करून त्याच्या सोबत कुणी भ्रष्टाचार करून अन्याय करीत असेल तर अशा मनुष्याच्या अधिकाराचे व कर्तव्याचे रक्षण करण्याचे व त्याला सामाजिक न्याय देण्याचे कार्य या मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटना,दिल्ली च्या माध्यमातून देश, राज्य व स्थानिक पातळीवर केल्या जात असून याचं संघटनेच्या माध्यमातून राळेगाव सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात एक महत्वाची तालुका कार्यकारणी दिनांक 2 जानेवारी रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहा मध्ये गठीत करण्यात आली
यामध्ये मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष पदी डॉ. भीमराव कोकरे , उपाध्यक्ष सूचित बेहरे, सचिव विनोद चिरडे यांची सर्वांनुंमते निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून हनुमान राडे, सौं. भावना खनगणं, मनोज आत्राम, अविनाश राडे, कु. माधुरी खडसे, गजानन खंडाळकर यांची निवड करण्यात आली आहे. यांनतर राळेगाव कार्यकारणी मधील सदस्य, पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र तथा आयकार्ड वितरित करण्यात येऊन सदस्यांना मानवाधिकार ईमरजन्सी हेल्पलाईन संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य व इतर कार्यक्रमाची रुपरेषा समजावून आपणास संघटनेच्या माध्यमातून नेहमी कोणते सामाजिक कार्य व कर्तव्य पारपडले पाहिजे या विषयावर राळेगाव तालुका अध्यक्ष डॉ. भीमराव कोकरे व सचिव विनोद चिरडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले तर या कार्यक्रमास राळेगाव तालुका कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थिती होते…