घाटंजी ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेतांना पकडले —— यवतमाळ एसीबीची कारवाई, घाटंजी ठाणेदारावर कारवाई होणार का ?

प्रतिनिधी/ यवतमाळ:- घाटंजी येथील फटाकाच्या विक्रेत्याच्या प्रतिष्ठानावर जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या पथकाची धाड थांबविण्यासाठी घाटंजी ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षकाला १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना यवतमाळ एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडले. ही कारवाई घाटंजी पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आल्याने घाटंजीचे ठाणेदार यांचा सुध्दा या लाच प्रकरणात सहभाग आहे का असा प्रश्न घाटंजी शहरात व पोलिस वर्तुळात चर्चीला जात आहे. त्यामुळे घाटंजीचे ठाणेदार शुक्ला यांच्यावरही वरिष्ठांकडून कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे. राजाभाऊ त्र्यंबकराव भोगरे असे लाच स्विकारणाºया पोलिस उपनिरिक्षकाचे नाव असून आज ०४ जानेवारीला सकाळी ही कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदार हे घाटंजी येथील स्थानिक रहिवासी असून त्यांचा फटाका विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. विनापरवाना फटाक्याचा माल साठवून ठेवल्यामुळे त्यांचेवर जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या पथकाकडून धाड घालून कारवाईची शक्यता आहे असे सांगुन तक्रारदाराला घाटंजी ठाण्याचे उपनिरिक्षक घोगरे यांनी घाबरवून सोडले. ही धाड थांबविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या पथकाला सहा लाख रुपये द्यावे लागतील असे घोगरे यांनी तक्रारदाराला सांगितले. यातून तडजोडीअंती ०१ लाख रुपये आज ०४ जानेवारीला देण्याचे ठरले. तत्पुर्वी तक्रारदाराने याबाबत एसीबी यवतमाळ कार्यालयात तक्रार नोंदविली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज सकाळ पासून घाटंजी ठाण्याच्या आवारात सापळा रचला