यवतमाळ प्रतिनिधि…. वीजग्राहकांना बिल माफ करण्याऐवजी, राज्यातील 75 लाख ग्राहकांचे कनेक्शन कापन्याचे आदेश दिले. या कृतिबाबत महावितरण कंपनी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत, भारतीय जनता पार्टीने, आज दिनांक 5 फेब्रुवारीला, जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात, महावितरण कंपनीच्या कार्यालयांवर हल्लाबोल व टाळेठोको आंदोलन केले. ….. भारतीय जनता पार्टी ब्दारा ,आज राज्यभरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते, त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात तीव्र आंदोलन केले………उमरखेड येथे भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा यांच्या नेतृत्त्वात, आ. नामदेवराव ससाने यांच्या प्रमुख उपस्थितित आंदोलन यशस्वी केले, यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुसद येथे आमदार निलय नाईक यांच्या नेत्तृत्वात तर यवतमाळात आमदार मदनभाऊ येरावार यांच्या नेतृत्त्वातील आंदोलनात, शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वणी येथे आमदार संजयरेडडी बोदकुलवार यांच्या नेतृत्त्वात तर अन्य सर्वच तालुक्यात स्थानिक तालुका अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी, तेथील महावितरण कंपनीच्या कार्यालयांवर धडक देऊन, हल्लाबोल व टाळेठोको आंदोलन यशस्वी करीत, महाविकास आघाडी सरकार चा निषेध करुन, वीजग्राहकांचे कनेक्शन कापल्यास परिणाम भोगावे लागेल असा इशारा देण्यात आला. आमदार डा.अशोक उईके कोरोनाने व आ. संदीप धुर्वे काॅरंटाईन असल्याने आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही…………
