September 23, 2021

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव घरीच साजरा करा—-वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे आवाहान,ऑनलाईन स्पर्धांची रेलचेल

यवतमाळ प्रतिनिधी:- वीरशैव हितसंवर्धक मंडळ वसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब,लिंगायत महिला मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजीत
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर ह्यांचा ९१६ वा जयंती उत्सव
या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर म. बसवेश्वर जयंती उत्सव दि.१४ मे ला त्याच उत्साहात एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे आयोजित केले आहे.महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ओळख समाजाला व्हावी या उदे्दशाने ऑनलाईन निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,महात्मा बसवेश्वर पुष्प सजावट स्पर्धा,चित्रकला स्पर्धा ईत्यादी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे,
या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवामध्ये खालील प्रमाणे स्पर्धा यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धकांन करिता आयोजित करण्यात आल्या आहेत.


निबंध स्पर्धा
विषय: युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर
नियम: आपले निबंध २५० ते ३०० शब्द मर्यादेमध्ये सुवाच्य अक्षरामधे लिहुन अथवा टंकलेखित करुन फक्त पीडीएफ स्वरूपातच प्रकल्प अधिकारी ह्यांचे व्हॉटसअप नंबर वर दि.१२ मे, २०२१ पर्यंतच पाठवायचे आहे
प्रथम पुरस्कार १५०१/-₹
द्वितीय पुरस्कार १००१/-₹
तृतीय पुरस्कार ५०१/-₹
पुरस्कारांचे प्रायोजक
स्व. शिवशकंर आप्पा मलीकार्जुन आप्पा तडकसे पुसद यांचे स्मृती प्रित्यर्थ स्व.आनुसया बाई शिवशकंर तडकसे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री संतोष शिवशंकरआप्पा तडकसे पुसद,तसेच प्रकल्प अधिकारी म्हणुन मंगेश शेटे ९४२०१२२०८०
सौ. कल्पनाताई देशमुख ९४२०७७५४३८ हे आहेत
महात्मा बसवेश्वर ह्यांचे फोटो किवां मुर्तीसह पुजा व पुष्प सजावट स्पर्धा(ऑनलाईन)
नियम: एका परिवारातील एकाच स्पर्धकाला सहभाग घेता येईल
वरिल स्पर्धेचे फोटो प्रकल्प अधिकारी ह्यांचे व्हॉटसअप वर दि १४ मे ला सायं ७ वाजे पर्यंतच पाठवायचे आहे
प्रथम पुरस्कार १५०१/-₹
द्वितीय पुरस्कार १००१/-₹
तृतीय पुरस्कार ५०१/-₹
पुरस्कारांचे प्रायोजक
स्व.श्रीमती सुधाताई व स्व.वसंतराव शेटे ह्यांचे स्मृती*
वसुधा प्रतिष्ठान यवतमाळ तसेच
प्रकल्प अधिकारी म्हणून
निलेश शेटे ९३७२६१२२७०
प्रदिप उमरे ९४२२१६८०३५
वक्तृत्व स्पर्धा(व्हिडीओ)
(१६ वर्षाखालील मुले व मुलीं करिता)
विषय: महात्मा बसवेश्वरांचे जीवन कार्य
नियम- वरिल स्पर्धे करिता २ ते ३ मिनिटां पर्यंतचाच व्हीडीओ प्रकल्प अधिकारी ह्यांचे व्हॉटसअप नंबर वर दि.१४ मे ला सकाळी ११ वाजे पर्यंतच पाठवायचे आहे
प्रथम पुरस्कार १५०१₹
द्वितीय पुरस्कार १००१₹
तृतीय पुरस्कार ५०१₹
पुरस्कारांचे प्रायोजक
डॉ.अशोक मेनकुदळे,अध्यक्ष, वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ तसेच प्रकल्प अधिकारी
नागेश कुल्ली ९४०३७४१११६
गिरीष गाढवे ९४२२९२१५५७ हे आहेत
चित्रकला स्पर्धा
विषय: महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्र
नियम- चित्र १२ x १८” आकाराचे असावे
सर्वांसाठी खुला गट असेल
वरिल स्पर्धेच्या चित्राचा फोटो प्रकल्प अधिकारी ह्यांचे व्हॉटसअप नंबर वर दि.१३ मे २१ ला सांय ५ वाजेपर्यंतच पाठवायचे आहे
प्रथम पुरस्कार १५०१₹
द्वितीय पुरस्कार १००१₹
तृतीय पुरस्कार ५०१₹


या पुरस्कारांचे प्रायोजक
श्री विश्वनाथ शंकरराव शेटे, यवतमाळ तसेच
प्रकल्प अधिकारी-
डॉ.जयेश हातगांवकर ९४२२१६७५३५
डॉ.किशोर मांडगावकर
७७७४८७४४४ हे आहेत
वरिल सर्व स्पर्धेमधील स्पर्धकानां प्रोत्साहन पर महात्मा बसवेश्वरांचा फोटो म.बसवेश्वर प्रिंटर्स, महेन्द्रं ठोबंरे ह्यांचे द्वारा देण्यात येईल.
परिक्षकांचा निर्णय राहील.
तसेच सर्व स्पर्धकांना आपले चित्र,व्हीडीओ नाव,मोबाईल नंबर व पत्त्यासह पाठवायचे आहे.
त्याचप्रमाणे सर्व विजेत्यांना पुरस्काराची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
सर्व स्पर्धेचां निकाल दि.१४ मे ला रात्री ९ वाजता जाहिर करण्यात येईल,स्पर्धेच्या अधिक माहिती करिता निलेश शेटे ह्यांचेशी संपर्क करावा व या ऑनलाईन जयंती उत्सवा मध्ये जास्तीत जास्त समाज बांधवानी सहभागी व्हावे असे वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ अशोक मेनकुदळे ह्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *