“मगरमच्छ के आसु” भावनिक आव्हाहन करू पण आर्थिक लूट सुरू ठेवू (नया है यह)

यवतमाळ दि.१३ मे -: गेल्या काही महिन्यापासून शहरातील कोविड केअर सेंटर विविध तक्रारी व घडलेल्या गंभीर प्रकाराने चर्चेत असल्याने त्या कोविड सेंटरच्या संचालिका यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे सेंटर वर होणाऱ्या तक्रारी व हल्ल्याचा निषेध करण्याचे भावनिक आव्हान व्हिडिओतून केले.त्यातूनच त्या रडून रडून सांगत आहे की,हा हल्ला तुमच्या आई बहिणीवर झाला असता तर काय केले असते अशा प्रकारच्या भावनिक होऊन “मगरमच्छ के आसु” गाळत असल्याचे दिसते आहे.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासकीय आरोग्य यंत्रणा हतबल झाली असल्याने जिल्हा प्रशासनाने काही खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी दिली.या संधीचा फायदा घेत खाजगी रुग्णालयांनी अक्षरशः कोविड रुग्णालयात रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू केली.असाच प्रकार “मगरमच्छ के आसु” गाळणाऱ्या संचालिकेच्या रुग्णालयातून सुरूच होता.यामुळे अनेक रुग्णालयाच्या नातेवाईकांनी अतिरिक्त शुल्क आकारत असल्याच्या यांच्या खाजगी कोविड सेंटरच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या.खाजगी कोविड सेंटरला शासनाने कोरोणा रुग्णांसाठी दरपत्रक ठरवून दिले असताना अनेकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली ते एवढ्यावरच थांबले नाही तर अनेकांना पैसे देण्याच्या कारणावरून ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने आपल्या नातेवाईकांचा जीव गमवावा लागला. यानंतरही या खाजगी कोविड सेंटरमधून असे अनेक प्रकार सुरूच असल्याने डॉक्टरच्या हलगर्जीपणाने व पैसे न दिल्याच्या कारणाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावले.यामुळे नातेवाईकांचा रोष निर्माण होणे सहाजिकच होते.यातूनच त्यांच्या कोविड सेंटरमध्ये तोडफोड करण्यात आली.एका प्रकरणात तोडफोडीची तक्रार न देता यांनी काहींच्या मदतीने घाटंजी तालुक्यातील एका महिलेच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये देऊन प्रकरण दाबले अशी सर्वत्र चर्चा आहे.मात्र दुसऱ्या प्रकरणात हे खाजगी कोविड सेंटर जास्तच अडचणीत आले. शहरातील नामवंत ॲड.अरुणराव गजभिये यांच्या मृतदेहाची अदलाबदली झाल्याने त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला व रुग्णालयात तोडफोड झाली या प्रकरणानंतर जास्तच वादग्रस्त ठरत असलेल्या त्या खासगी कोविड सेंटर बंद करण्याची मागणी जोर धरू लागली.यामुळे आपले खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या भीतीने या रुग्णालयाच्या संचालिका यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांचा पाठिंबा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे बोलल्या जात आहे.त्यांनी जर आधीपासूनच शासकीय नियमांचे पालन करून व दर पत्रक त्यानुसार शुल्क आकारून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्राण वाचविले असते तर कदाचित ही वेळ आली नसती त्यांची चूक नसती तर त्यांच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत राहून सहकार्य केले असते.त्यांना आपल्या डॉक्टरकी या पेशाला काळीमा फासत कोरोना महामारीला एक सुवर्ण संधी समजून पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांची लूट केल्याचे स्पष्ट होत असल्याने अखेर “जैसी करणी वैसी भरणी” म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मात्र जे डॉक्टर्स खऱ्या अर्थाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वाचविण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे व प्रशासनाला सहकार्य करत आहे त्या सर्व देवदूत डॉक्टरांना सलामच !……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *