ध्यास नवा ; एक श्वास नवा ! भाजपा कडून मोफत ऑक्सीजन बँक

प्रतिनिधी /यवतमाळ :-  आ. मदन येरावार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या समर्पण संकल्पनेतून “ध्यास नवा; ,एक श्वास नवा !” उपक्रम आज सुरू करण्यात आला. होम कोरेन्टाईन कोरोना बाधितांना याचा मोठा फायदा होणार आहे.
माणसाचे आयुष्य हे श्वासात मोजले जाते. माणूस जन्माला आला की पहिला श्वास घेतो आणि मरताना शेवटचा श्वास सोडतो. दोन श्वासातील अंतर म्हणजे आयुष्य. असं साधं गणित कोरोनाने अधिकच गंभीर आणि किचकट बनविले. एरव्ही कधी विचार देखील न केलेल्या श्वासासाठी वणवण सुरू झाली. ऑक्सिजन साठी देशभर हाहाकार सुरू झाला. ही अडचण लक्षात घेता, माजी मंत्री तथा आमदार मदन येरावार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी मोफत ऑक्सिजन कॉंनसनट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. 
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे, अनेकांना रुग्णालयात दाखल न होता, घरीच उपचार करण्याची वेळ येते, अशा रुग्णांना ऑक्सीजन देण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिल्या जातो, ही गरज लक्षात घेऊन, ऑक्सीजन  काॅन्सनट्रेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आज 17 मे रोजी, ही ऑक्सीजन बॅंक आ. मदनभाऊ येरावार, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, आ. नामदेव ससाने, महासचिव राजू पडगिलवार, सचिव सुरज  गुप्ता यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली . गरजूंनी पुनम चौकातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रकल्प  संयोजक सुरज गुप्ता(738538811)  डाॅक्टर  स्नेहल  राशतवार(7038386038)  यांचेशी संपर्क साधावा  असे कळविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed