सुसंस्कार विद्या मंदिर येथे “उन्हाळी बालकट्ट”‘ ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन

यवतमाळ प्रतिनिधी:-बैठे बैठे क्या करे, कर ना है कुछ काम, चलो जाते है समर कॅम्प’… परिक्षा संपल्या आणि उन्हाळी सुट्टी सुरू होताच विद्यार्थांना उन्हाळी शिबिरांचा वेध लागतात. तसेही शाळा म्हटली की, शिक्षक आणि कधीच न संपणारा अभ्यास असे मुलांचे मत असते. पण मुलांचे हेच मत बदलण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी सुसंस्कार विद्या मंदिरा द्वारा “उन्हाळी बालकट्टा”
‘ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना या दुर्धर आजाराचे सावट सर्वत्र पसरलेले आहे. आजूबाजूच्या वातावरण सर्वत्र नकारात्मकता पसरणारे आहे.
सर्व जग ठप्प झालेले आहे. मात्र कोरोना काळातही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन मुलांना शिक्षणापासून वंचित न राहू देणाऱ्या सुसंस्कार विद्या मंदिरने विद्यार्थ्यांची मानसिकता व पालकांचे विचार डोळ्यापुढे ठेवत उन्हाळ्यातही मुलांना क्रियाशील, स्वावलंबी व खेळते ठेवण्याचा प्रयत्न करीत ‘उन्हाळी बालकट्टा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांच्या संकल्पनेद्वारे या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कमी वयात इंटरनेटसारखे प्रभावी माध्यम हातात आले की, त्याचा गैरवापर होण्याची अनेक उदाहरणे, आपल्याला पाहायला मिळतात. मूल रडले किंवा जेवत नसले तर त्याच्या हातात मोबाइल किंवा आयपॅड दिला जातो. पुढे थोडी समज आली की, याच उपकरणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचेही प्रमाण वाढत जाते
परंतु ह्या सर्व गोष्टीचा सकारात्मक उपयोग कसा करावा ह्याचे सुंदर नियोजन सुसंस्कार विद्या मंदिरने केले आहे,
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक या तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. याअंतर्गत पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या बोबड्या बोलात बालगीते, बडबडगीते, स्वतःचा परिचय दिला.
तसेच घर स्वच्छता, विविध कलाकुसर, नृत्य, पेंटिंग खेळांचे व्हिडिओ सादर केले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देखील बालकाम, विज्ञान प्रात्याक्षिके, श्लोकपठाण, गोष्ट कथन, आरोग्यवर्धक खाद्यपदार्थाचे व्हिडिओ, नृत्याचे, गीताचे व्हिडिओ पाठविले. तसेच पक्षांसाठी घरटी तयार करणे त्यांना पाणी, खाद्यपदार्थ देण्यासाठी पात्र बनविलीमास्क बनविणे,तसेच अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार करून प्रात्यक्षिकाद्वारे त्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील शिकवल्या. या उन्हाळी बाल कट्टा याद्वारे ‘पालक,विद्यार्थी,शिक्षक’ हे नाते दृढ झाले. नाविन्यपूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची धडपड व त्यांचा उत्साह वाखाळण्याजाेगा होता.
शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.उषा कोचे “उन्हाळी बालकट्टयाची” संकल्पना स्पष्ट करतांना म्हणाल्या कोरोनाच्या दरम्यान प्रत्येक शाळेचे ऑनलाईन क्लासेस घेतले,त्यानंतर परिक्षा सुध्दा झाल्यात त्यानंतर उन्हाळी सुट्या लागल्यात पण परत कोरोणाचा वाढता प्रकोप,घरोघरी कोरोणाचे वाढते रूग्ण,लॉकडाऊन, सामाजीक संपर्क बंद झालाय, भितीयुक्त ताण तनाव चिंता ईत्यादी गोष्टीनं मधुन मुलांना बाहेर काढणे गरजेचे होते,मुलं तनावमुक्त रहावी,त्यांना योग्य कामात गुंतवुन ठेवुन त्यांचा आत्मविश्वास,क्रियाशीलता, वाढवीणे,मुलं काहीतरी चांगल करीत आहे हे बघुन पालक सुध्दा चिंतामुक्त होवुन त्यांना व मुलांना मानसिक दुष्ट्या पुरक वातावरण मिळावे व अभ्यासा व्यतीरीक्त काहीतरी वेगळं करतांना मुलांना व पालकांना आनंद व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन उन्हाळी बाल कट्टयाचे आयोजन करण्यात आले, पालकांनी पण आपली मते बोलुन दाखवली,पालकांच्या मते उन्हाळी बालकट्टा’ शिबीर मुलांना स्फुर्ती देणारा नाविन्यपुर्ण उपक्रम ठरलाय,कोरोणा काळात मिळालेल्या संधीच सोन कस करायचं याचा जणु काही दाखलाच सुसंस्कार विद्या मंदिराने दिला आहे,तसेच उन्हाळी सुट्टी न उपभोगता सुसंस्कार च्या सर्व शिक्षकांनी ऑनलाईन ‘उन्हाळी बालकट्टा’ शिबीर घेवुन मुलांचा सर्वांगीन विकास घडवुन आणण्याचा प्रयत्न वाखडण्याजोगा आहे असे म्हणाले,तसेच शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांचा या उपक्रमामागील हेतू म्हणजे मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळावी, मुलांना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकवण्याची गोडी निर्माण व्हावी. मुले स्वावलंबी व्हावीत, मुलांना शिक्षकांच्या अभ्यासाव्यतिरिक्त काही दाखवण्याची संधी मिळावी असा होता. विद्यार्थ्यांचा भरघोस व उस्फुर्त प्रतिसाद व पालकांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे अभिनंदन करीत कौतुकाची दिलेली थाप याद्वारे हेतू साध्य झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. व ‘उन्हाळी बालकट्टा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन सुसंस्कार विद्यामंदिरद्वारे करण्यात आले.