September 23, 2021

यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात खून

यवतमाळ  :  यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात रेती तस्कर अक्षय राठोड चा जावाई करण परोपटेवर अज्ञात दोन ते तीन जणांनी गोळीबार करून व धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

करण परोपटे हा यवतमाळ शहरातील  स्टेट बँक  चौकामध्ये काही काम निमित्य आला असता मागावर असलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार व धारदार शस्त्राने हल्ला चढविला. त्याच्या छातीमध्ये व पोटात चार गोळ्या लागल्याचे  करण परोपटेचा मृत्यू झाला.

तर ब अग्नी शत्रातील निघालेली एक गोळी बाभुळगाव येथील इसमाच्या पायात लागल्याने त्यालाही रूग्णालयात भरती करण्यात आले. हा हल्ला रेतीघाट तस्करी याच्यावरून झाल्याचे परिसरात चर्चा आहे,घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर वडगाव पोलीस ठाण्याचे मनोज केदारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घटनास्थळावरून चार काडतुस पोलिसांनि जप्त केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *