साप्ताहिक चालकाने मागितली खंडणी —– पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
यवतमाळ -: खोट्या तक्रारीवरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेरीस आणने त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांच्या विरूध्द साप्ताहिकाचा आधार घेत चुकीच्या बातम्या पेरणे,एवढेच नव्हे तर माहिती अधिकाराचा वापर करून पुढच्या व्यक्तीला पैशाची मागणी करणे,असे एका साप्ताहिकाच्या पत्रकारावर गंभीर आरोप करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी राज्याच्या लोकायुक्तासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे,अशी माहिती एका निवेदनातून देण्यात आली आहे.
पुसद येथील एका साप्ताहिकाचा चालक असलेल्या राजु नामक व्यक्तीकडून हा सर्व गंभीर प्रकार होत असल्याचा आरोप सदर निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या साप्ताहिक चालकाविरूध्द यापुर्वी खंडनी मागितल्याचे गुन्हेही दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येत आहे.
पुसद वनविभाग कार्यालयात लिपीक असलेले गोपाल जिरोणकर यांनाही सदर साप्ताहिकाच्या चालकाने प्रचंड मानसिक त्रास दिला. हा त्रास न देण्यासाठी एक लाख रूपयाची खंडनी मागितली. ही खंडनी न देता जिरोणकर यांनी याप्रकरणी पुसद शहर
पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीवरून पोलिसांनी सदर चालकाविरूध्द कलम ३८४ अंतर्गत खंडनीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यानंतरही वरीष्ठांकडे विविध प्रकारच्या देवून जिरोणकरसह इतरही अनेकांना मानसिक त्रास देण्याचा या चालकाचा प्रकार सुरू असल्याने वरीष्ठांनी त्याची गंभीर दखल घेवून या साप्ताहिक चालकाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिरोणकर यांच्याविरूध्द विविध प्रकारच्या तक्रारी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यवतमाळ यांचे कार्यालय यांच्याकडे करण्यात आल्यानंतर सदर कार्यालयानेही या संबंधीत चौकशी करून सदर व्यक्तीने केलेली तक्रार खारीजही सुध्दा केली आहे व तसे पत्र सदर साप्ताहिक चालकाला संबंधीत कार्यालयाकडून देण्यात आल्याचीही माहिती आहे. मात्र मागितलेली रक्कम अदा न करता उलट खंडनीचा गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या सदर साप्ताहिकाच्या चालकाने आता त्यांना मानसिक त्रास देणे सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
एमएसईबीचे कनिष्ठ अभियंता असलेल्या एका व्यक्तीला २०१६ मध्ये या साप्ताहिकाच्या चालकाने खंडनी मागितल्याची तक्रार पुसद शहर | पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेवून गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती | आहे.
खंडनीच्या या तक्रारी दाखल झाल्यानंतरही यापासून बोध न घेता अनेक कर्मचारी व न अधिकाऱ्यांच्या तक्रारी करून त्यांना हा पत्रकार मानसिक त्रास देत असल्याची माहिती आहे. एका प्रकरणात त्याच्या साप्ताहिकाच्या घोषणापत्रात खोटी माहिती दिल्यावरूनही साप्ताहिकाचे रजिस्ट्रेशन रद्द | करण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे. अशा या वाढत्या प्रवृत्तीमुळे पुसद उपविभागातील काही कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी धास्तावले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, लोकायुक्त अमरावती यांनी सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.