वेड…. कोणाला चित्रांचे तर कोणाला मित्रांचे——शब्द रचना पराग पिंगळे
##वेड ##
वेड….
कोणाला चित्रांचे
तर कोणाला मित्रांचे,
कोणाला वाचनाचे
तर कोणाला लेखनाचे ।।
कोणाला खाण्याचे
तर कोणाला गाण्याचे,
कोणाला पाळीव श्वानाचे
तर कोणाला गुप्त दानाचे ।।
वेड……
कोणाला खेळण्याचे
तर कोणाला खेळ बघण्याचे,
कोणाला गरजूंच्या सेवेचे
तर कोणाला आपल्या ध्येयाचे ।।
कोणाला मुक्त पर्यटनाचे
तर कोणाला प्रतिमा टिपण्याचे,
कोणाला दुःख जाणण्याचे
तर कोणाला मनसोक्त जगण्याचे ।।
वेड…..
कोणाला कीर्तनाचे
तर कोणाला सुवर्तनाचे,
कोणाला शक्तीचे
तर कोणाला ईश्वर भक्तीचे ।।
कोणाला शिल्पकलेचे
तर कोणाला मूर्तिकलेचे,
कोणाला नृत्यकलेचे
तर कोणाला नाट्यकलेचे ।।
वेड…
कोणाला काव्यकलेचे
तर कोणाला श्राव्यकलेचे,
कोणाला पाककलेचे
तर कोणाला वस्त्र कलाकुसरीचे ।।
कोणाला बोलण्याचे
तर कोणाला जाणण्याचे,
कोणाला वादनाचे
तर कोणाला गायनाचे ।।
वेड…
कोणाला नेतृत्वाचे
तर कोणाला वक्तृत्वाचे,
कोणाला ज्ञानसंचायचे
तर कोणाला धन संचयाचे ।।
कोणाला कर्तृत्वाचे
तर कोणाला भ्रातृत्वाचे,
कोणाला फक्त जगण्याचे
तर कोणाला इतरांना जगावण्याचे ।।
वेड म्हणजे जिवंत पणा….
म्हणून माणसाला कोणतेतरी
वेड हे असलेच पाहिजे…..