कोविशिल्ड व कोव्हॅक्सिंन लसीकरणाची भीती मनात न बाळगता सर्वांनी लसीकरण करावे –संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस

भंडारा- (जिल्हा प्रतिनिधी) -कोरोनाला न घाबरता त्याला हिमतीने तोंड द्यावे
त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी आता कोविशील्ड व कोव्हॅक्सिंन लसीचे दोन्ही डोज ठराविक अंतराने घ्यावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथे केलेले आहे .
कोरोना सारख्या महामारीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी बिनधास्त फिरणे सुरू केले असून नियम धाब्यावर बसवून बेफिकीरपणे गर्दीत फिरताना दिसत आहेत
.परंतु हे धोकादायक असून कोरोणाचे प्रमाण कमी झाले म्हणून गाफील न राहता गर्दीच्या ठिकाणी, आठवडी बाजाराच्या ठिकाणी,धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्र या ठिकाणी सोशल डिस्टन चे पालन ,मास्क चा वापर ,त्याचप्रमाणे सनिटायझर चा वापर करून कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान सुद्धा संजीव भांबोरे यांनी केलेले आहे.
यावेळी डॉ. सौ महात्मे ,ए .एल .एन .फुलझेले ,सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी हिवरकर ,पोलीस पाटील दिलीप शहारे, चिखलपहेला येथील ग्रामसेवक गाढवे ,सोनकुसरे सहाय्यक शिक्षक ,आशा वर्कर सौ. सहारे ,अंगणवाडी सेविका शशिकला देशमुख अंगणवाडी मदतनीस विमल शहारे ,मदने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.