एसटीच्या चाकाखाली आल्याने इसम ठार ; पुसद बसस्थानक येथील घटना
एसटीच्या चाकाखाली आल्याने इसम ठार ; पुसद बसस्थानक येथील घटना
शहर प्रतिनिधी :- पुसद शहरातील बस्थानाक येथे सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मागील चाकाखाली आल्याने एका 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार नेर तालुका आगाराची एस टी बस क्रमांक एमएच- 40 एन – 8946 हे अमरावती ते पुसद आली होती या दरम्यान बस्थानाकामध्ये एस टी बास्थांकध्ये येत असताना विकास रामभाऊ गावंडे नामक इसम वय ३७ वर्ष राहणार श्रीरामपूर पुसद हे एसटीच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चुराडा होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नसगरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता उप जिल्हा रुग्णालय पुसद येथे शव पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तापास पुसद पोलीस करीत आहे.