मेडिकेयर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल च्या हलगर्जीपणामुळे आमटी येथील बाळंतीणीचा प्रसूतीनंतर मृत्यू

 

नातेवाइकांची वसंत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुसद तालुका प्रतिनिधी :- पुसद तालुक्यातील आमटी येथील सौ. माधुरी विकास व्हडगीर वय अंदाजे २२ वर्ष या महिलेला प्रसूती करीता येथील मेडिकेअर मुल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे २ जूनच्या रात्री दाखल करण्यात आले. यादरम्यान महिलेचे सिझरिंग करण्यात आले. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. तदनंतर महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला रक्ताच्या बॉटल्स लावण्यात आल्या व उपचार करण्यात आले मात्र दिनांक ३ जूनच्या दुपारी १ वाजताच्या दरम्यान महिलेच्या मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली नातेवाईकांनी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोप करीत यासंदर्भात तक्रार दाखल केली. वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये ई डी दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक थावरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडवे यांच्या मार्गदर्शनात मेडिकेअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे पंचनामा करण्यात आला व त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थित मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे वसंत नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण नाचनकर यांनी शनिवारी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *