गॅस सिलिंडरचा स्फोटात लाखोंचे नुकसान, सुदैवाने जिवितहानी टळली

पुसद तालुका प्रतिनिधी :- पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर येथील बजरंग नगर मधील भिसे कुटुंबांचे घर व त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जवळपास दोन लाख सहा हजार रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने घर बंद असल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर ग्रामपंचायत मधील बजरंग नगर येथील प्रकाश पुंजाराम भिसे यांच्या राहत्या घरी आज सकाळी ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास घर बंद असतांना सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने त्या खोलीत कुणी नसल्याने जिवितहानी झाली नाही. परंतु त्या घरात रेंट वर असलेल्या कुटुंबाच्या घरातील टि. व्ही. कपाट दुचाकी, सोने व रोख रक्कमेसह संसार उपयोगी साहित्य संपूर्ण सामान जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, आजूबाजूचे लोक गोळा झाले.यावेळी कवडीपुरचे तलाठी ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करण्यात आला. या आगीमध्ये घर मालकाचे व रेंट वर राहणाऱ्या व्यक्तीचे अंदाजे दोन लाख सहा हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यामुळे या आगग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी यासाठी अगग्रस्त कुटुंबांच्या वतीने सबंधित शासनाकडे मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती तलाठी ठेंगे यांनी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *