प्रा.जी.प.शाळा डेहनी शालेय पोषण पोष्टीक विद्यार्थ्याच्या खिचडीत निघाल्या आळ्या
तालुका प्रतिनिधी: :-दिग्रस तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषद डेहनी या:- शाळेत पौष्टिक खिचडी वाटपामध्ये दिनांक 21 जुलै वार गुरुवार मध्यान्ह पोष्टीक खिचडी आहारामध्ये आळ्या व काळ्या रंगाची शेंबडी चक्क खिचडी शिजविण्याच्या गंजामध्येच आळ्या व काळ्या रंगाची शेंबडी आळी शिजवुन तेच खिचडी आहारामध्ये विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात आल्याचा गंभीर स्वरूपाचा प्रकार प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहणी या गावांमध्ये घडला आहे. सदर विद्यार्थ्यांना डब्यामध्ये पोष्टिक खिचडी वाटप करताना त्या डब्यामध्ये टाकण्यात आलेल्या खिचडी मध्ये एक आळी व काळ्या रंगाची शेंबडी आळी विद्यार्थ्यांना भोजनासाठी देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रकार प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहणी या गावांमध्ये होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे डेहनी गावामध्ये विद्यार्थ्यांच्या वडिलांमध्ये रोष व्यक्त होत आहे. अशा विषारी खिचडीतुन विद्यार्थ्यांची जीवित हानी झाल्यास याला नेमक कोण जबाबदार ? एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव जायची मुख्याध्यापक हे वाट पहात आहे का असा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्वच्छता अभियान राबविण्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करोडो रूपयाचा निधी महाराष्ट्र राज्याला देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. केवळ कागदपत्रावर स्वच्छता अभियान दाखवण्याचा गोरख धंदा सर्रास सुरू आहे सर्वात महत्त्वाचे शासन नियमावली मध्ये तांदूळ व धान्य मालाची साफसफाई व्यवस्थित करणे, अन्न शिजवण्याचे काम स्वच्छ ठिकाणी करणे स्वयंपाक घरासह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट करणे भांड्याची साफसफाई करणे जेवणातल्या ताटाची स्वच्छता करणे पिण्याचे पाणी स्वच्छ भरणे शाळा व शाळेचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवणे हा महत्त्वाचा शासन निर्णय असून सुद्धा याला सुद्धा हरताळ भाजण्याचे काम प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहनी या शाळेमध्ये होताना दिसून येत आहे. या बाबीकडे दिग्रस तालुक्यातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या शुभदा पाटील शालेय पोषण आहार अधिकारी यांनी खिचडी मध्ये आळ्या व काळ्या रंगाची शेंबडी विद्यार्थ्यांना शिजवून खाण्यासाठी देण्यात आल्यानंतर आर्थिक हितसंबंध न जोपासता दोषीवर शुभदा पाटील यांनी कठोर कारवाई करुण विद्यार्थ्यांची होणारी बोळवण थांबवावी
दिग्रस तालुक्यातील डेहणी या गावात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेमध्ये प्रामुख्याने पहिली ते आठवीपर्यंत अंदाजे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये कर्तव्यावर वावरणारे मुख्याध्यापक पदी राजीव विठ्ठलराव ढोके हे कार्यरत आहे तसेच यामध्ये शिक्षक व शिक्षिका मेघा गुंडावार, विजय मुमडवार, शरद चौधरी, ऋतुजा जोरी , राजेश्वर वानखडे , नरेंद्र अस्वार, शिल्पा कळंबे व शितल मेश्राम हे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे. परंतु मध्यान शाळेच्या सुट्टीमध्ये पौष्टिक खिचडी शिजवण्यासाठी जबाबदारी असणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक व बचत गटांच्या मदतीने पौष्टिक खिचडी शिजवली जाते पौष्टिक खिचडी शिजवण्यासाठी तेल मोहरी हळद तिखट मीठ कांदा लसूण पेस्ट आधी बाबी लागतात या सर्व बाबीची सुद्धा चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी दिग्रस तालुक्यातील होत आहे