● धक्कादायक घटनेने खळबळ

वणी: तालुक्यातील मंदर या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. आई, वडील व भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ‘जिवती’ लावण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घरात एकटी असलेल्या मंद स्वभावाची बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उजागर झाली. याप्रकरणी शनिवार दि. 23 जुलै ला वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माणसाची नियत कधी बिघडेल हे कल्पनेच्या पलीकडे आहे. सण उत्सवा निमित्य अनेक पारंपरिक प्रथा अद्याप सुरू आहे. पोळा सणाच्या पूर्वी घराच्या उंबरठ्याला जिवती लावण्यात येते. घरात सुखशांती लाभावी असा यामागील प्रघात आहे. देवाच्या नावे सोप्या पद्धतीने भीक मागणाऱ्या त्या नराधमांने अल्पवयीन मंदबुद्धी असलेल्या बलिकेलाच वासनेची शिकार केले.

मंदर या गावात वास्तव्यास असलेला व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारात ही खळबळजनक घटना घडली. आई मोलमजुरी करते तर वडील एका कंपनीत कामाला आहेत तर मोठा मुलगा वणीत काम करतो.

घटनेच्या दिवशी तिघेही आपापल्या कामावर गेले होते. घरी एकटीच ती 17 वर्षीय बालिका होती. दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान जिवती लावणारा व्यक्ती आजीच्या घरी आला, तिच्या जवळ जिवती दिली व तिच्या मागेच तो घरात दाखल झाला. त्याने घराचा दरवाजा लावून तिच्या सोबत अश्लील चाळे करत लैंगिक वासना क्षमवली.

सायंकाळी आई घरी परतल्यावर ती बालिका रडत असल्याचे तिला दिसले. तिने विश्वासात घेऊन तिला विचारपूस केली तसेच शेजारीपाजारी विचारणा केली. सुरेश उर्फ सुऱ्या पोचिराम हा नराधम जिवती लावायला आला असे स्पष्ट झाले.

भयग्रस्त असलेल्या त्या परिवाराने रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे करताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed