लेकाने धाडले बापाला यमसदनी ; बेलोरा येथील मन सुन्न करणारी घटना
दारूच्या नशेत नेहमी आईला मारहाण करीत असल्याचा वचपा काढण्याचा उद्देशाने वडीलाचे निघृण हत्या
तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील बेलोरा येथील ६० वर्षीय बापाला नेहमी आईला मारहाण करीत असल्याचा वचपा काढण्याच्या उद्देशाने घरात झोपून असल्याचा फायदा घेत डोक्यात लोखंडी रॉडने ( टॉमी) वार करून यमसदनी पाठविल्याची घटना आज दि.२४ जुलै २०२२ रोजी सकाळी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की मृतक गणेश महादेव काशीदकर (वय -६०) वर्ष रा.बेलोरा याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत नेहमी बायकोला मारहाण करीत होता. एक महिन्यापासून हे कुटुंब चिंचोली येथे वास्तवास आले . परंतु शेती बेलोरा येथे असल्याने मृतक गणेश काशीदकर चिंचोली येथून बेलोरा येत होते. अशातच शुक्रवारी त्याच्या आईने लहान मुलाला सांगितले की, बापाने मारहाण केली यावरून आरोपी मुलगा वैभव गणेश काशिदकर (वय- ३२) याने रागाच्या भरात बापाला संपवायचे या उद्देशाने ट्रकची टायर खोलण्याची लोखंडी रॉड( टॉमी) घेऊन शेतात बापाला बघितले. परंतु तेथे बाप आढळून आला नाही. तेव्हा त्याने थेट बेलोरा येथील घर गाठून खाटीवर झोपुन असलेल्या बापाच्या डोक्यात लोखंडी रोडने वार करून ठार केले. डोक्यावर इतका जबर मार होता की, डोक्यातून मेंदू पडून होता व जमीन रक्तबंबाळ झाली होती.
शुक्रवार दुपारी ३ वाजता पासून बापाला ठार केले आपल्यावर नाव येऊ नये म्हणून आरोपी मुलाने शनिवारीच्या रात्री आपल्या चुलत भावाला विचारले की, माझे वडील कुठे गेले त्यांचा थांगपत्ता नाही. तेव्हा बेलोरा येथील घरात बघितले तर खाटीवर मृत अवस्थेत बाप पडून असल्याने त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून माझ्या वडिलांचा कुणीतरी खून केला असे म्हणतात पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी उलट तपासणी करीत खाकीचा धाक दाखविताच बापाला मीच मारले असून बाप नेहमी दारूच्या नशेत आईला मारहाण करीत असल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर , पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतकाला पत्नी , दोन मुले असून मोठा मुलगा जम्मू येथे बीएसएफ मध्ये कार्यरत आहे. लहान मुलाने बापाला ठार केल्याने आरोपी मुलगा वैभव गणेश काशीदकर याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर करीत आहे.