शासकीय धान्याचा ट्रक उलटला, चालक बचावला माञ क्लिनर गंभीर जखमी
शहर प्रतिनिधी :- नागपुर तुळजापूर महामार्गावरील मांगुळ या गावालगत शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे सुदैवाने ट्रकचालक बचावला मात्र क्लीनर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
नागपूर तुळजापूर मार्गावरील अपघाताची मालिका सुरू असून आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान तुमसर शहरातून शासकीय धान्य सोलापूर कडे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा यवतमाळ शहरालगत असलेल्या मांगुळ गावाजवळ जनावर मधात आल्याने अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने चालक बचावला असून त्याला किरकोळ मार लागला आहे मात्र क्लीनर हा गंभीर जखमी झाला आहे या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यवतमाळ ग्रामीण पोलिसांना या अपघाताची माहिती दिली आहे