मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करा


शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या
          *************************


भारतीय जनता पार्टीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

 

 

 

 

मारेगाव प्रतिनिधी :- मारेगांव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे झालेल्या अतिवृष्ठीने शेतीमधील पराठी, सोयाबीन, तुर या सारखे रब्बी पिके उध्वस्त होऊन शेतजमिनी खरडल्या गेली.या मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25हजार रुपये अनुदान प्रदान करा अशी मागणी मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसांत पर्जन्यवृष्ठीने व बेंबळा प्रकल्पाचे बेसूर नियोजनाने तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले.बहुतांश ठिकाणी नदी, नाले, कालवे, तुंब फुगल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला व हे पाणी शेतात शिरून जनुकाय तलावाचे स्वरूप आले, शेतजमिनी खरडल्या गेल्या त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. दापोरा, चिंचमंडळ, गाडेगाव, बोरी, चनोडा, केगाव, शिवनी, सोहिट कोसारा, मुक्ता दांडगा आपटी हे सर्व गावे वर्धा नदीच्या काठावर असल्यामुळे हजारो हेक्टर जमीन व पिके संपूर्ण पाण्याखाली आल्याने येथील शेतीचे खत शेतीतील अवजारे ,जनावराचा चारा अक्षरश पुराने वाहून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नवरगाव येथे धरणाच्या वेस्टरवर वरुन फुलाला पाणी आले असतात कमीत कमी वीस गावाचा संपर्क तुटला जातो
परिणामी ,शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असतांना सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरी 25 हजार रुपये आर्थिक मदत प्रदान करा व संकटातून मुक्त करावे अशी मागणी मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.सदरील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार भगत साहेब यांचे मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले आहे.निवेदन देतांना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, तालुका सरचिटणीस, प्रशांत नांदे , तालुका सचिव ओ.बी.सी.दल विठ्ठल दानव, भा, ज.पा.युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर , बांधकाम सभापती न.प. मारेगाव राहुल राठोड, शहर उपाध्यक्ष दत्तू लाडसे ,शहर सचिव मारोती राजूरकर, उपाध्यक्ष विश्वजीत गारघाटे, उपाध्यक्ष नवसू सुडीत, प्रतीक धानकी, नंदू खापणे, शैलेश ठाक आदींची उपस्थिती होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed