अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा कुर्हाडीणे निर्घृण खून
नेर प्रतिनिधी :- नेर तालुक्यातील खोलापुरी येथे पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा कुर्हाडीणे वार करुन पतीने निर्घृण खून आज सकाळी केला.
खोलापुरी येथील रहिवासी मोहण सोमला राठोड वय ५५ वर्ष हा पत्नी कमला मोहण राठोड वय ५० वर्ष हिच्या वर नेहमी संशय घेत होता अशातच रात्री दोघात भांडण झाले आणि सकाळी अंदाजे ७ वाजताचे दरम्यान दोघेही शेतात जातांना खोलापुरी ते डोमगाव रस्त्यावर मस्का मायच्या ओट्याजवळ वाद सुरू असताना मोहन सोमला राठोड याने हातातील कुर्हाडीने कमला मोहण राठोड हिच्या डोक्यात, पाटीवर व पोटावर निर्घृण वार करून खून केला.खून केल्याची तक्रार खोलापुरी येथील पोलिस पाटील सुभाष दलपत चव्हान यांनी नेर पोलिस स्टेशनला सकाळी ९:३० वाजता दिली. आरोपी मोहण सोमला राठोड वय ५५ यांच्या वर भा.द. वी ३०२ कलम लावण्यात आली अटक करण्यात आली असून पुढील तपास नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर करीत आहे.