मालवणी या गावी श्री दत्त हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यवतमाळ तर्फे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मालवणी (कळंब) येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
शिबिरामध्ये १०३ रुग्णावर विविध आजारांवर डॉ. रजत दलाल एम डी (मेडिसिन) यांनी उपचार केलेत.
स्त्री रोग तज्ञ डॉ. श्रुती स्वप्नील सुने MBBS DGO गायनॅकॉलॉजिस्ट यांनी ३५ स्त्री रुग्णावर उपचार व मार्गदर्शन केले गर्भवती महिलांचा यामध्ये अंतर्भाग होता.
सुनियोजीत असे निशुल्क शिबीर आयोजनामध्ये मालवणी सरपंच श्रीमती दीपाली जामनेर, उपसरपंच सौ. मनीषा काटे व इतर मंडळींचे सहकार्य लाभले.
हॉस्पिटल तर्फे मुख्य समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर देशपांडे, नीलिमा शिंदे सिस्टर, मयुरी चातूरकर, श्यामराव नागरीकर व महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजनेचे अक्षय भागानगरकर यांनी मोलाचे योगदान दिले.