वाघाने केली तरुणाची शिकार, भुरकी (रांगना) शेत शिवारातील घटना
तालुक्यातील भुरकी (रांगना) येथिल शेतशिवारात वाघाने एका तरुणाची शिकार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
वणी :- अभय मोहन देउळकर (२५) असे मृतकाचे नाव आहे.
अभय हा दररोज प्रमाणे आज दि. १० नोव्हेंबर ला बुधवारी शेळ्या चराईला घेऊन शेत शिवारात गेला होता. दरम्यान सायंकाळ होताच शेळ्या घराकडे परत आल्या परंतु अभय हा वापस आला नाही. घरच्यांनी गावात शोधाशोध केली परंतु कुठेही आढळुन न आल्याने अखेर त्याचा शोध घेतला असता झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाची चमु घटनास्थळी पोहोचले आहे. सद्या वणी तालुक्यात वाघांचा वावर सुरू झाल्याने व आता मानव हानी होऊ लागल्याने शेतकरी शेतमजूर व नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्या कापूस वेचणीची लगबग सुरू असतानाच आता वाघाची दहशत निर्माण झाल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.