विभक्त होण्याच्या मार्गावरील ६ जोडप्यांच्या पुन्हा रेशीमगाठी जुळल्या
यवतमाळ :- विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या ६ जोडप्यांनी शनिवार दिनांक १२/११/२०२२ रोजी कौटुंबिक न्यायालयात झालेल्या लोक अदालतीत पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेतला
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ श्री. एस. व्ही. हांडे, कौटुंबिक न्यायालयाचे श्री. सुभाष रं. काफरे व श्री. के. ए. नाहर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली.
या मध्ये कौटुंबिक स्वरूपाचे १६ दावे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. या दाव्यांमधिल ६ जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी न्यायाधीशांच्या हस्ते सोबत नांदायला गेलेल्या जोडप्यांना ” नांदा सौख्यभरे” चे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सध्या न्यायालयात वैवाहिक वादाचे व पोटगीचे ६८३ दावे प्रलंबित आहेत. या पैकी ५० दावे लोक अदालती समोर निकाली काढण्यासाठी ठेवले होते. न्यायाधीश मा. श्री सुभाष रं. काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त न्यायाधीश श्री. व्ही. जी. बोधनकर, विवाह समुपदेशक श्रीमती ज्योती जी. माटे व अॅड. सौ. एस. व्ही. मददीवार यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले.
लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. अमित बदनोरे व कार्यकारिणी सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रभारी प्रबंधक श्री. नारायण जाधव, श्री. प्रमोद फाळके लघु लेखक, श्री. मो. शकील शेख वरिष्ठ लिपिक, श्री. कार्तिक दळवी, मनीष गंपावार, सचिन पांगारकर, श्रीमती सुनीता एस. सोनटक्के, श्री. शुभम फरतोडे व दत्ता जाधव या सर्व कर्मचाऱ्यांनी लोक अदालतीच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.