यावतमळात सामूहिक राजीनाम्याने आम आदमी पार्टीत खळबळ

गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पार्टीमध्ये जातीय तणाव निर्माण झाला असून यामध्ये जातीय दिशातून अनेकांना डावल्या जात असल्याची ओरड गेल्या काही दिवसापासून सुरू होती या वागणुकीमुळे कंटाळून अखेर अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
चार दिवसापूर्वी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा कार्यकारणी घोषित केली ही कार्यकारणी घोषित करताना कोणालाही विश्वासात न घेता ही कार्यकारणी जाहीर केल्याची आरोप अनेक पदाधिकाऱ्यांना केला असून या कार्यकारणीला विरोध केला.राजीनामे देणाऱ्यामध्ये यवतमाळ तालुक्यामध्ये संवाद यात्रेदरम्यान महत्त्वाची भूमिका असलेले कवीश्वर पेंदोर संघटन सहमंत्री,बाबाराव कुमरे अनुसूचित जमाती आघाडी, ओमकार अंबाडकर विद्यार्थी आघाडी,अश्विन राठोड सोशल मीडिया सहसंयोजक, नुजत शेख भारतीय नागरिक आघाडी,गजानन धुर्वे जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश राठोड जिल्हा कार्यकारणी सदस्य यांचे सह अनेकांनी राजीनामे दिले.यामध्ये जातीय राजकारण करत अनेक निष्ठावंतांना डावल्यामुळे त्यांनी राजीनामे दिल्याची चर्चा सुरू आहे. यानंतरही आम आदमी पार्टीमध्ये कार्यरत असलेले शेकडो कार्यकर्ते वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचेही बोलल्या जात असून आम आदमी पार्टीला जिल्ह्यात खूप मोठे भगदाड पडणार हे मात्र निश्चित आहे.
आम आदमी पार्टीचे विदर्भ नेते वंचितच्या वाटेवर असल्याची सर्वत्र चर्चा
आम आदमी पार्टीमध्ये वारंवार जातीयवाद केल्या जात असल्याचा आरोप निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात असताना जिल्ह्यात आम आदमी पार्टीमध्ये कार्यरत असलेले विदर्भाच नेतृत्व करणारे भाई अमन हे पक्षातील पदाधिकाऱ्यांना खूपत असून आम आदमी पार्टीमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असल्यामुळे काही लोकांना ते खूपत आहे.
तसेच पश्चिम विदर्भ सहसंयोजक पदी भाई अमन तर यवतमाळ तालुका संयोजक पदी मोबीन शेख हे मुस्लिम चेहरे असल्यामुळे आम आदमी पार्टीतील आपलं वजन कमी होईल की काय अशी पार्टी दिली.काही पदाधिकाऱ्यांना भीती असल्यामुळे जातीय द्वेष केल्या जात आहे.यातूनच अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून याचे पडसाद लवकरच उमटतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे माझे दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उर्फ ऍड प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली असल्याची माहित आहे.