जिल्ह्यात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
जिल्ह्यात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
यवतमाळ जिल्ह्यात वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकल्यांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तीन दिवसांत दररोज शेकडो रुग्ण हे सर्दी, खोकल्याचे दाखल होत आहेत.
यामध्ये वृध्द व्यक्तीपासून लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. ऋतू बदलताच सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. सर्दी, खोकल्याच्या आजाराने तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडेही सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
लहान मुले, वृद्धांना थंडीचा अधिक त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.येथे गेल्या तीन दिवसांत सर्दी, खोकल्याने त्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. दररोज १०० रुग्ण हे सर्दी खोकल्याने येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.