पाटणबोरी येथे श्री संत नगाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

श्री संत नगाजी महाराजांचीची जयंती गावत मिरवणूक काढून साजरी केली

पाटणबोरी :- महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखली जाते ,आपला विदर्भही संत परंपरेसाठी परिचित आहे. विदर्भातील या संत परमेश्वराच्या अग्रभागी असलेले श्री संत नगाजी महाराज यांची आज जयंती, श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध पंचमी सके 1676 ला झाला,त्यांनी आपल्या 90 वर्षाचा अवतार कार्यात विविध जाती धर्माच्या हजारो अनुयायांना परमार्धाकडे वाढविले, महाराष्ट्रातील विविध जातीत जन्मलेल्या संताप्रमाणेच नाभिक समाजात जन्मलेल्या संत नगाजी महाराजयांनी वारकरी पंथाची पताका आपल्या खांद्यावर घेतली ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. जुन्या काळातील रुढी वाद्यांचा विरोध झुकारून त्यांनी समाजाला समितीची बधूभावाची एकतेची शिकवण दिली. असंख्य लोकांना सुलन अशा भक्तिमार्गाची दिशा दाखवली त्यांनी आपल्या अनेक अभंग व साहित्यातून घराघरापर्यंत भक्तिमार्गाचा व मानवतेचा संदेश पोहोचविला व वर्धा जिल्ह्यातील पारडी येथे त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. साधारण 200 वर्षापासून त्यांच्या जयंती सोहळा उत्सव साजरा केला जातो. पाटणबोरी येथे सुद्धा दरवर्षी प्रमाणे या ही वार्षि सर्व भाविक भक्त आनंदाने त्यांचे विचार घराघरात पोचविण्यासाठी व त्यांचे स्मरण करण्यासाठी जयंती उत्सव भक्ती भावाने साजरा केला.सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजाअर्चा करून भजन मंडळी व दिंडी सह गावात पालखी काढली व श्री संत नगाजी महाराज यांच्या जयंती चे निमित्य साधून श्री संतोष नक्षणे यांची आई श्रीमती ललिताबाई देविदास नक्षणे यांच्या वाढदिवसा निमित्य गोरगरीब व गरजू लोकांनां ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

त्यानंतर भोजनाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक भक्त यांनी प्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम संतोष नक्षणे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवयांनी अथक परिश्रम घेऊन जयंती उत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed