शेतकऱ्याच्या फसवणुकीस कृषी विभाग व पालकमंत्री जबाबदार पत्रकार परिषदेत शिवसेनेचा आरोप
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा खोटा सर्वे तसेच पंचनामे करण्यात आले पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपये तीन रुपये पाच रुपये दहा रुपये असे टाकून शेतकऱ्याची थट्टा केली आहे शेतकऱ्याच्या थट्टेला तसेच फसवणुकीला कृषी विभाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे जबाबदार आहेत असा आरोप शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाला विमा कंपनी सोबतच जिल्हा कृषी अधीक्षक व संपूर्ण कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे पालकमंत्री संजय राठोड जबाबदार असून शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणात भरपाई घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही तसेच पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे याकरिता पालकमंत्री व कृषी विभाग यांनी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून शिवसैनिकांनी दिला आहे.