शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर जिल्ह्यात उग्र आंदोलन करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा इशारा.
यवतमाळ:- तालुक्यातील कारेगाव येवली येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात पिक विमा कंपनीने फक्त तीन रुपये टाकले त्यात रिलायन्स पिक विमा कंपनीचा व्यवस्थापक हा त्या शेतकऱ्याकडे आला असताना संतापलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या व्यवस्थापकाला चांगला चोप दिला.
अशातच पालकमंत्री संजय राठोड यांनी वेळीच लक्ष दिले असते तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती असा आरोप व्यवस्थापकाला चोप देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन इंगोले यांनी केला आहे, तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई चे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकारी गजानन इंगोले यांनी दिला आहे.