हवेत गोळीबार करून वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या बर्थडे बॉय गुंडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
=========================================
वणी :- पोलीस रेकार्ड वरील आरोपीकडून वणी पोलिसांनी विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना राजूर भांदेवाडा मार्गावर घडली. शेतात वाढदिवसाची पार्टी करत असताना पोलिसांनी रेड करून आरोपीला ताब्यात घेतले. उमेश किशोरचंद राय (34) रा. महादेव नगरी चिखलगाव असे सराईत आरोपीचे नाव आहे. घडली. .हवेत गोळीबार करून एका नामचीन गुन्हेगाराने आपला वाढदिवस साजरा केल्याचे कबूल केले . याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बर्थडे बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरे केले जातात. असे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवायाही केल्या आहेत.
एक सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसह एका शेतात पार्टी करून आपला वाढदिवस साजरा करीत होता .
प्राप्त माहितीनुसार राजूर भांदेवाडा मार्गावर मनोज कश्यप यांचे शेतात डीजे लावून नाचगाणे करून धिंगाणा करीत वाढ दिवस पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार अजित जाधव यांना माहिती देवून त्यांचेसह सपोनि दत्ता पेंडकर व स्टाफ सह पोलीस रात्री 2.30 वाजता शेतात गेले. पोलिसांना बघून दारू पिऊन नाचणारे अनेक लोक तिथून पळून गेले. आरोपी उमेश राय हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला जेरबंद केले . पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली .त्याच्या कमरेवर लटकलेली विदेशी बनावटीची रिव्हाल्वर ज्याच्या वर Made in USA No. 11 लिहिलेली पोलिसांनी मिळाली. सोबतच वाढदिवस पार्टी करीत असताना त्याच पिस्तुलमधून दोन राउंड हवाई फायर केल्याची कबुलीवरून पोलिसांनी कारतूसचे 2 खाली कव्हरही जप्त केले. पोलीस स्टेशन वणी येथे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
उमेश राय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून ,अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत .मागील एका वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर पडला होता .उमेशकडे विदेशी बंदूक असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती . पोलीस त्याच्या मागावरच होते .अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडलाच .