भर पावसात महावितरण विरोधात मनसेचां झटका मोर्चा
मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात हजारों शेतकऱ्यांचा आक्रोश
महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. याच मुद्द्याला घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात मारेगावात भव्य “झटका मोर्चा” काढण्यात आला. जिल्ह्यात सकाळपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असताना सुद्धा तालुक्यातील हजारो शेतकरी आणि सामान्य जनतेने या झटका मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता.
तालुक्यात ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या व्यवस्थित नसल्यानें शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळत नाही. नाही. २०१८ पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले, त्त्यांची जोडणी अद्यापही झालेली नाही. याच बरोबर उच्चदाब आणि कमी दाबाच्या कारणाने अनेक ट्रान्सफार्मर जळालेले आहे. हे ट्रान्सफार्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी शेतकरी वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करतात मात्र यांना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असतात. याच समस्येला घेऊन तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते राजु उंबरकर यांची भेट घेतली होती. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला घेतं आज २८ नोव्हेंबर रोजी मनसेच्या मारेगाव तालुक्याच्या वतीने भव्य झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मार्डी चौकातून निघालेला मोर्चा तहसिलदार कार्यालयावर धडकला. सकाळपासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती तरी सुद्धा आपल्या समस्येवर तोडगा निघावा यासाठी तालुक्यातील हजारो शेतकरी आणि सामान्य जनतेने पावसाची गय न करता या मोर्चात सहभागी नोंदविला होता.
महावितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा परिणाम कृषी फिडर आणि गावठाण फिडर वर होत असून यामुळे अघोषित भारनियमन शेतकरी आणि गावकऱ्यांवर लादले जात आहे. कृषी पंपाना ८ तास वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना महावितरणच्या मनमानी कारभार करत कधीही पुरवठा खंडित करतात. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. हीच परिस्थिती गावठाण फिडर वर सुद्धा आहे. . महावितरणच्या या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभार सुरळीत व्हावा ही मागणी आजच्या आयोजित झटका मोर्चातून करण्यात आली. दरम्यान या मोर्चा नंतर मारेगाव तहसिलदार उत्तम निलावाड यांनी उंबरकर आणि महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता अशिष पवार, सहा.अभियंता अतुल आत्राम यांच्याशी संवाद साधला. राजु उंबरकर यांनी केलेल्या मागणी नुसार शेतकऱ्यांना ८ तास अखंडित वीजपुरवठा व गावठाण फिडर वरील पुरवठा सुरळीत करुन २४ तास वीज पुरवठा चालू राहील. त्याचं बरोबर तालुक्यातील सर्व ट्रान्सफार्मर येत्या २ दिवसात दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन महावितरण कडून देण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, नगरसेवक अनिल गेडाम, नगरसेविका अंजुम शेख,धनंजय त्रिंबके, रोशन शिंदे, वामन चटकी, नबी शेख, उदय खिरटकर, संतोष राठोड, किशोर मानकर, आदित्य बुच्चे, कुणाल शेडामे, सुरेश काळे, शुभम भोयर, आकाश खामनकर, निखिल मेहता, जम्मू शेख, इर्शाद खान, महीला सेनेच्या अर्चना बोदाडकर, प्रिया लभाणे, विद्या हिवरकर, वैशाली तायडे, सिंधू बेसकर, धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, अजिद शेख, लक्की सोमकुंवर, इरफान खान, गितेश वैद्य, वैभव पुराणकर, नितीन खंडाळकर यांच्या सह तालुक्यातील हजारो शेतकरी व असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.