ओरिसा मधून यवतमाळ येत असलेला गांजा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जप्त.

ओरिसा येथून यवतमाळ बाभुळगाव मार्गे चार चाकी वाहनांने येत असलेला गांजा नाकाबंदी करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

 

 

ओरिसा मधून यवतमाळ येत असलेला गांजा नागपूर बायपास वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला सदर पथक कार्यालयात हजर असताना त्यांना राखडी रंगाच्या कारमधून देवगाव येथून बाभुळगाव मार्गे गांजा येत असल्याची माहिती मिळाली त्या वाहनावर इंग्रजीत पठाण असे लिहिले होते आणि काचांना काळ्या रंगाची फिल्म लावली होती एलसीबी चे पोलीस निरीक्षक आधार सिग सोनवणे यांनी यवतमाळ येथील बाभूळगाव कडून नागपूर जाणाऱ्या बायपासवर सापळा रसला यावेळी वाहन दिसताच वाहन थांबविण्यात आले त्यात सलमान शेख शकील शेख राहणार अंबिका नगर यवतमाळ चालक सलमान शेख इकबाल शेख राहणार सुरणा लेआउट यवतमाळ बसलेले होते वाहनाची तपासणी केली असता डिक्की मधील एका पोत्यात तीन लाख 7 हजार440 रुपये किमतीचा 15 किलो 372 ग्रॅम गांजा मिळून आला हा गांजा ओरिसा येथील आनंद शाहू यांच्या माध्यमातून अनिल यादव या ट्रक चालकाकडून तळेगाव येथील बायपास वर उतरण्यात आल्याची कबुली सलमान शेख याने दिली गांजा व वाहन असा एकूण सहा लाख 42 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिलेला तक्रारीवरून सलमान शेख शकील शेख सलमान शेख इकबाल शेख आनंद शाहू अनिल यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सलमान शेख वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed